ग्रामपंचायत वाशाळा

वाशाळा हे गाव महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील मोखाडा  तालुक्यातील एक गाव प्रगतशील व ऐतिहासिक गाव आहे. वाशाळा गावात पुरातन पांडवलेणी आहे, तसेच हनुमान मंदिर हे गावचे धार्मिक केंद्रबिंदू आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे २४४०  आहे. गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ४, अंगणवाडी केंद्रे ५ व व्यायामशाळा १, सभामंडप-१  अशी शैक्षणिक व शारीरिक सुविधा उपलब्ध आहेत.तसेच गावामध्ये सन २०२३ पासून पिण्याच्या पाण्याच्या सोईने ग्रामपंचायत वाशाळा   ने ग्रामस्थ पाण्याचा वापर पिण्यासाठी करतात,तसेच  गावात पुरातन मंदिरे, सामुदायिक सभागृह, पाणीसाठवण, सार्वजनिक विहिरी व शेततळी अशा धार्मिक व सामाजिक सुविधा देखील आहेत.गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून भात, नागली हे  ही प्रमुख पिके घेतली जातात.

वाशाळा   ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत लाभार्थी यांना घरकुल चा  लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत वाशाळा  .गावाने संपूर्ण खुले शौचमुक्त (ODF प्लस) दर्जा मिळवला आहे. जलसंधारण व पाणीपुरवठा योजना अंतर्गत गावात पाणीपुरवठा नियमित करण्यात आला आहे. तसेच तंटामुक्ती गाव मोहीम अंतर्गत देखील उत्कृष्ट काम केले आहे.

 

लोकसंख्येची माहिती

 
क्रमांकक्षेत्रतपशील
एकूण लोकसंख्या
२४४०
पुरुष लोकसंख्या
१२२१
महिला लोकसंख्या
१२१९
०–६ वर्षे वयोगटातील लोकसंख्या
२०१ 
अनुसूचित जाती (SC %)
१.४ %
अनुसूचित जमाती (ST )
१२५७ 

उपलब्ध पायाभूत सुविधा

क्रमांक सुविधा प्रकार उपलब्ध (होय/नाही) संख्या रस्त्याने जोडलेले (होय/नाही)
ग्रामपंचायत कार्यालय होय १  होय
प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) होय १  होय
उपकेंद्र (Sub Center) होय १  होय
अंगणवाडी होय ५   होय
प्राथमिक शाळा  होय ४  होय  
माध्यमिक शाळा  होय १  होय 
उच्च माध्यमिक शाळा
महाविद्यालय / व्यावसायिक केंद्र  –
समुदाय भवन (Community Hall)  होय होय 
१० स्वस्त दर दुकान (PDS)  होय होय 
११ श्मशानभूमी / स्मशानभूमी  होय    
१२ इंटरनेट / मोबाईल टॉवर  होय होय 
१३ सीएससी केंद्र (CSC Center)   होय होय 

होय

प्रशासकीय संरचना

ग्रामपंचायत बँक माहिती

खाते नाव:  

बँकेचे नाव :  

शाखेचे नाव: 

अकाउंट नंबर :  

आई एफ एस सी कोड : 

पत्ता :